विक्रोळी :
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे समुह क्रमांक ७, रमाकांत देशमुख मार्ग, टागोर नगर येथे ६०० मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या गलती दुरूस्तीचे काम २४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपासून २५ मार्च २०२२ रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत म्हणजे २४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपासून शुक्रवार, दिनांक २५ मार्च २०२२ रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत एस विभागांमधील प्रभाग क्रमांक ११७, ११८, ११९ परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.