मुंबई :
बॉलीवूड सिंघम अजय देव याने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तरुण अजयला पत्र लिहिले आहे. हे पत्र त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पत्रात त्याने अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केलेल्या अजयला येत असलेल्या संकटांचा उल्लेख करत त्याने लोकांकडून होणाऱ्या टीका आणि सातत्याने येणारे अपयश यामुळे खचून जाऊ नकोस असा सल्ला त्याने तरुण अजयसोबतच सर्व तरुण वर्गाला दिला आहे.
View this post on Instagram
अजय तरुण आणि तरुणांना त्याने सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, कारण तुझ्या मार्गामध्ये येणारी संकटे हीच भविष्य तुझ्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. यातूनच तुला तुझी खरी क्षमता आणि ताकद कळणार आहे, असे सांगत त्यांनी स्वतःच्या ध्येयाच्या दिशेने जाताना अडखळत राहा, चालत राहा, पण थांबू नकोस असा ज्येष्ठत्वचा प्रेमळ सल्ला त्यांनी स्वतःमधील तरुण अजयला दिलेला आहे.