मुंबई
शब्दांची मर्यादा कमी मात्र तरी देखील अत्यंत प्रभावी असणारे ट्विटर माध्यमाने त्यांच्या अंतर्गत व्यवस्थापनामध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात आले आहे. पराग भारतीय वंशाचे असून यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या देशभर आहे.
ट्विटरची शब्द मर्यादा कमी असली तरी देखील अत्यंत प्रभाविशाली लोक देखील या माध्यमाचा वापर करतात. या प्रमुख माध्यमाच्या मुख्य पदी अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यामुळे सर्व क्षेत्रांतून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग यांनी अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड विद्यापिठामधून कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.त्यानंतर पराग यांनी जगविख्यात असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट आणि याहू या कंपनीत येथे महत्वाच्या पदांवर काम केल आहे.
ट्विटरला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्यात आणि २०१६-२०१७ दरम्यान मोठ्या संख्येने युझर्सला स्वत:कडे आकर्षित करण्यात ट्विटरला जे यश मिळालं त्यात पराग यांचा मोठा वाटा आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. २०१७ मध्ये पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या ‘सीटीओ’पदी नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत.
सीटीओ पदी नियुक्त झाल्यापासून पराग यांनी विविध बदल हे ट्विटर मध्ये केले. कंपनीची तांत्रिक आघाडी कशी असेल, मशिन लर्निंगचा वापर कसा करता येईल आणि याबाबत त्यांनी विशेष सुधारणां केल्या आहेत.2019 मध्ये जॅक यांनी पराग यांना प्रोजेक्ट ब्ल्यूस्कायचे प्रमुख पद दिलं. ट्विटरवरील चुकीच्या माहितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ओपन सोर्स पद्धतीने ब्ल्यूस्काय प्रकल्प सुरु करण्यात आलेला.काल पराग कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी नियुक्तीची घोषणा करण्यात आली. पराग अग्रवालची अंदाजे एकूण संपत्ती 1.52 दशलक्ष डॉलर म्हणजेच 11,41,91,596 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या नियुक्तीनंतर पराग यांनी जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया ट्विट केले आहे. सत्या नडेला, सुंदर पिचई, ‘ अरविंद कृष्ण, ‘ शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.