मुंबई
ऑल इंडिया मुस्लीम इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यातील मुस्लीमाना आरक्षण मिळावे या मागणीसाठी चांदीवली येथे सभा आयोजित केली होती. ही सभा होणार की नाही यावर शेवटपर्यंत प्रश्नचिन्ह होता मात्र अखेर ही सभा झाली. यावेळी ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्यातील महाविकास व मोदी सरकारवर सुद्धा सडकून टीका केली आहे. काँग्रेसची देखील सभा आहे त्याला परवानगी एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राहुल गांधी यांची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम १४४ लावला जातो असा आरोप ओवेसी यांनी केला आहे.
आमची रॅली होणार म्हटल्यावर मुंबईत 144 कलम लागू केलं. आता राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. तेव्हाही 144 कलम लावणार की त्यांचं फुलांनी स्वागत करणार आहात? असा सवाल करतानाच राहुल गांधी येतील तेव्हा ओमिक्रॉनची चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमिक्रॉनची चर्चा होते अशी टीका ओवेसी यांनी केली.
एमआयएम मतांची विभागणी करतील अशी भीती तुम्हाला दाखवली जाते. आता तेच जातीयवाद्यांसोबत बसून सत्ता भोगत आहेत, असं सांगतानाच आमच्यामुळे जर मत विभागणी होत असेल तर उद्धव ठाकरे हे धर्मनिरपेक्ष आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
मुसलमान कधीपर्यंत धोका खात राहणार सेक्युलरझममधून काय मिळालं आरक्षण नाही, आदर नाही, न्याय नाही. किती मुस्लिम आज इथे पदवी धारक आहेत पण नोकरी नाही. प्रायमरी 22 टक्के माध्यमिक 13 टक्के, उच्च शिक्षण 7.8 टक्के आणि पदवी धारक फक्त 4.9 टक्के मुसलमान शिक्षण घेतात असे ओवेसी यांनी सांगितले.