Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नाने मिठी नदी शेजारील झोपडीधारकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप

banner

मुंबई :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांना विधानभवनातील मुख्यमंत्र्यांचे दालनात सदनिका ताबा पात्र व चावी वाटप करण्यात आले. शिवसेना चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या अथक प्रयत्नाने क्रांतीनगर, संदेशनगर या मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांचे कुर्ला पश्चिमेकडील प्रीमियर कॉलनीतील एचडीआयएल संकुलात पुनर्वसन करण्यात आले.

२००५ मध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमध्ये क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामनदाया पाडा या विभागात मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली होती. तत्कालीन शासनाने तात्काळ निर्णय घेऊन बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी २००८ मध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून कुर्ला पश्चिमेकडील प्रीमियर कॉलनीतील एचडीआयएल संकुलात इमारती बांधण्यात आल्या. परंतु सदनिका देण्यात आल्या नव्हत्या. क्रांतीनगर, संदेशनगर या विभागात दरवर्षी पावसाळ्यात ४ ते ५ फूट पाणी भरत असून सातत्याने वित्तीय हानी मोठ्या प्रमाणावर होत असते. यासंदर्भात आमदार दिलीप लांडे ह्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून विविध स्तरावर बैठक घेऊन प्रशासकीय पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी आणि लोकप्रतिनिधींनी केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. परंतु आमदार दिलीप लांडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत वचनपूर्ती केली. त्यामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुनर्वसन झालेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व शिवसेना आमदार दिलीप (मामा) लांडे यांचे आभार मानले. यावेळी पर्यावरण व पालक मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांच्यासह प्रणव लांडे, प्रयाग लांडे, महेश पानीग्राही, मोहन थोरात आदी उपस्थित होते.

Related posts

अगस्ती साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा; भाजप नेते मधुकरराव पिचडांचा धुव्वा

Voice of Eastern

डॉ. आंबेडकर जयंती व अन्य सणांसाठी दोन लाखांचा पोलिस बंदोबस्त तैनात

पाच वेळा हृदय विकारानंतरही ६१ वर्षीय महिलेला मिळालं जीवनदान

Leave a Comment