Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

‘लीजेंड्स ऑफ जीएमसी’ उपक्रमामुळे  जे.जे. रुग्णालयातील विद्यार्थ्यांना दिग्गज डॉक्टरांकडून धडे

banner

मुंबई : 

जे.जे. रुग्णालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ डॉक्टरांच्य ज्ञानाचा लाभ व्हावा या उद्देशाने ‘लीजेंड्स ऑफ जीएमसी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जे.जे. रुग्णालयामध्ये पूर्वी कार्यरत असलेले आणि आता त्यांच्या विषयामध्ये देशभरात नावारुपाला आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शनामध्ये डॉक्टरांचा अनुभव, रुग्ण तपासण्याची पद्धत, नवनवीन तंत्रज्ञान याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे.जे. समूह रुग्णालयाला १७८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या रुग्णालयातून शिक्षण घेतलेले डॉक्टर देशातच नव्हे तर जगभरामध्ये नावारुपाला आले आहेत. या नावारुपाला आलेल्या दिग्गज डॉक्टरांनी नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, जेणेकरून त्यांच्या अफाट ज्ञानाचा शैक्षणिक लाभ नव्या पिढीतील डॉक्टरांना मिळू शकेल. यासाठी जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ‘लीजेंड्स ऑफ जीएमसी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जे.जे. रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर, प्रसिद्ध चिकित्सक आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त ९३ वर्षीय डॉ. फारुख उडवाडिया यांनी जे.जे. रुग्णालयामधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कक्षभेटीमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या खाटांच्या बाजूला उभे राहून रुग्णांची माहिती त्यांच्यासमोर मांडली. यावेळी डॉ. उडवाडिया यांनी रुग्णांचा इतिहास घेणे, तपासणी करणे आणि निदान करणे हे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शिकवले. सुमारे अडीच तास त्यांनी कक्षामध्ये फेरी मारली. सध्या विद्यार्थी रुग्णाचा इतिहास जाणून घेण्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राथमिक तपासणीवर अवलंबून न राहता रुग्णांचा इतिहास जाणून घेण्याची कला अवगत केली पाहिजे असा सल्ला डॉ. उडवाडिया यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. जो डॉक्टर रुग्णाला समजून घेतो, जो रुग्णाशी संबंध निर्माण करतो तो चांगला चिकित्सक असतो, असेही ते म्हणाले.

औषध विभागाच्या प्रमुख डॉ.विद्या नगर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय सुरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे, यांनी त्यांच्या कक्ष भेटीची सर्व व्यवस्था केली होती. जे. जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत आल्यावर त्यांनी पाचव्या मजल्यावर असलेल्या कक्ष क्रमांक ७ मध्ये जाण्यासाठी त्यांनी उद्वाहनाऐवजी पायऱ्याने गेले. यातूनच त्यांनी विद्यार्थ्यांना पहिला धडा दिला.

महिन्यातून एकदा मार्गदर्शन करण्याची विनंती

डॉ. उडवाडिया यांच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी महिन्यातून एकदा जे.जे. रुग्णालयामध्ये यावे. अशी विनंती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी त्यांना केली. तसेच. डॉ. उडवाडिया यांना जे.जे. रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतलेल्या डॉ. श्रीनिवास शानबाग यांचेही त्यांनी आभार मानले.

Related posts

रोहे – पनवेल लोकल सेवा सुरु करा, मनसेची स्वाक्षरी मोहीम

Voice of Eastern

सोशल मूव्हमेंट अँड रिव्हॉल्युशन पुस्तकाचे उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन

‘कोकण गौरव’ क्रूझमुळे मुंबई – कोकणचा प्रवास होणार सुखकर

Leave a Comment