मुंबई
मुंबईत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका 30 वर्षीय महिलेने आपल्या सात वर्षाच्या मुलासह धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला. चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.
बानू सहदेव मोरे आणि अमित सहदेव मोरे अशी या दोघांची नवे आहेत. महिलेने सात वर्षाच्या मुलासह विद्याविहार येथे धावत्या लोकल ट्रेन मधून उडी घेतली, यात महिलेचा मृत्यू झाला. मात्र कर्तव्यशील पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ जखमी मुलाला खाद्यावर टाकून राजावाडी रुग्णालय गाठले आणि मुलाचे प्राण वाचवले. या महिलेने कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर आला आहे.
विद्याविहार स्थानकाच्या जवळ या महिलेने रेल्वे खाली मुलासह उडी मारली. यावेळी या महिलेचा जागीच मृत्यू झाला मात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस शिपाई करनुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याला जखमी अवस्थेत खांद्यावर उचलून राजावाडी रुग्णालय गाठले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आला मात्र पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जा असे सांगण्यात आले. पोलिसांनाही तातडीने सायन रुग्णालयात या लहानग्याला पुढील उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी घेऊन गेले. पण या ठिकाणी सर्वसामान्य येणारा वाईट अनुभव पोलिसांना देखील आला. सुरवातीला या मुलाला दाखल करण्यास नकार देण्यात आला. मात्र अखेर दबावतंत्र वापरतात या लहान मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मुलाला पोलिसांनी तातडीने उपचार मिळवून दिल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे मात्र सायन रुग्णालयात मिळालेला अनुभव हा रुग्णालय प्रशासनाला रुग्णा बद्दल किती आपुलकी आहे हे दाखवून देतो.