मुंबई
जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. विक्रोळी मध्ये देखील या दिशा सामाजिक ग्रुपच्या वतीने सामाजिक संघटनेच्या वतीने आज जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांगाना व्हीलचेअर आणि अंधांना विशेष घड्याळ देण्यात आली.
विक्रोळी येथील दिशा सामाजिक ग्रुपच्या वतीने जागतिक अपंग दिन आज साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ग्रुप तर्फे २५ अंध व्यक्तीला विशेष घड्याळ वाटण्यात आली त्याबरोबर तीन व्हीलचेअर देखील अपंगांना देण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून दिशा सामाजिक ग्रुप जागतिक अपंग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करते व या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपंगांना मदतीचा हात मिळावा यासाठी प्रयत्न करत असते. या कार्यक्रमाला नगरसेविका मनिषा रहाटे, उपेंद्र सावंत, माजी महापौर दत्ता दळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण शुभदा चव्हाण , वाहतूक वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक जतकर आणि दिशा सामाजिक ग्रुपचे दिनेश बेरी शेट्टी, कार्याध्यक्ष राजू राणे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोविड योद्ध्यांचा देखील सत्कार करण्यात आला
आम्ही गेल्या अनेक वर्षापासून जागतिक अपंग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन अपंग बांधवांसाठी करत असतो. या वर्षीदेखील सामाजिक भान जपत आम्ही या वर्षी अपंगांना विविध उपयोगी वस्तूंचे वाटप केले आहे या वस्तूंच्या माध्यमातून त्यांचे जीवन सोयीस्कर होईल हीच अपेक्षा आहे असे दिशा सामाजिक ग्रुप चे अध्यक्ष दिनेश बैरीशेट्टी यांनी सांगितले.