Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

महिलांमधील बोन मिनरल डेन्सिटोमेट्री मूल्यांकनाचा मुंबईमध्ये होणार जागतिक विक्रम

banner

मुंबई :

‘व्हिजन फॉर हर : हील हर, एज्युकेट हर अँड रिस्पेक्ट हर’ या थीमच्या आधारे मुंबई ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीतर्फे मुंबईमध्ये १९ ऑक्टोबला ४० केंद्रांवर जास्तीत जास्त महिलांमधील बोन मिनरल डेन्सिटोमेट्री (बीएमडी) मूल्यांकन करत जागतिक विक्रम करण्यात येणार आहे. बोन मिनरल डेन्सिटी (BMD) मापन-मुक्त शिबिर हे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. या शिबिरात स्त्रीरोग तसेच प्रसूतीपूर्व गर्भवती रूग्णांची मोफत तपासणी मशीनद्वारे केली जाईल.

मुंबई ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ही १९३४ मध्ये स्थापन झालेली सेवाभावी संस्था आहे. या संस्थेमार्फत मुंबई शहरातील महिला रुग्णांसाठी एक दिवसीय बोन मिनरल डेन्सिटी (BMD) मापन-मुक्त शिबिर १९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत ठेवण्यात आले आहे या शिबिरामध्ये स्त्रीरोग तसेच प्रसूतीपूर्व गर्भवती रूग्णांची मोफत तपासणी या मशीनद्वारे केली जाईल. या शिबिराचा उद्देश महिलांमधील व्हिटॅमिन डी पातळी तपासणे हा आहे, कारण सर्व वयोगटातील महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस शोधण्यासाठी हे एक महत्त्वाचे चिन्ह आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्यातील कॅल्शियमची पातळी अप्रत्यक्षपणे कळू शकेल. शरीरात हाडांच्या निर्मितीसाठी आणि हाडे निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे मुंबई ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीचे (मोग्ज) अध्यक्ष डॉ. निरंजन चव्हाण यांनी सांगितले.

जसे वय वाढते, हाडे ठिसूळ होतात आणि शरीरातील कॅल्शियम कमी होऊन हाडांचे विकृती, फ्रॅक्चर होते आणि स्त्रियांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. ज्यामुळे तिच्या कार्यात अडथळा येतो. म्हणूनच आपल्या रोजच्या भाज्या आणि मांसाहारी पदार्थांमध्ये उपलब्ध असलेल्या कॅल्शियमच्या पौष्टिक आणि आहाराव्यतिरिक्त आपल्याला अतिरिक्त पूरक आहाराची आवश्यकता असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

मुंबईत या कार्यक्रमात ४० हून अधिक केंद्रे सहभागी होणार आहेत. ज्यात मुंबईत एकाच दिवशी महिलांच्या लोकसंख्येचे जास्तीत जास्त बोन मिनरल डेन्सिटोमेट्री (बीएमडी) मूल्यांकनाचा जागतिक विक्रम रचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या डॉक्टरांचा CME मधे सत्कार करण्यात येईल, असे मुंबई ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. निरंजन चव्हाण यांनी सांगितले.

Related posts

खंडू रांगणेकर स्मृती क्रिकेट स्पर्धा : अलिना मुल्लाला विजेतेपद

मुंबई विद्यापीठाच्या प्र कुलगुरूंनी दिली विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ

युक्रेनमधून परलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शिक्षणाचा दर्जा कायम राखा -आयएमए

Leave a Comment