मुंबई
बीडीडी चाळी पुनरबांधणी प्रकल्पात सरकार रहिवाशांच्या मागण्या संदर्भात चालढकल करीत असल्याने सरकारला जागे करण्यासाठी अखिल बीडीडी सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष डॉ राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली वरळी येथे प्रातिनिधिक स्वरूपाचे उपोषण आयोजित केले होते. सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कारकर्त्यांसह यात सामील झाले. उपोषणकर्ते विक्रम बाबर,संतोष पवार, तेजस खरात,ललिता जगताप, प्रवीण वैरागळ,हरीश खरात व सचिन वाघमारे हे सामील झाले होते
सरकारचे मंत्री व म्हाडा अधिकारी प्रकल्पाचे उदघाटन झाल्या पासून विविध प्रकारच्या घोषणा व आश्वासने देत आहेत, 10 दिवसात रहिवाशांच्या काही मागण्यांचे सरकारी GR काढतो अशा घोषणा करून आज 3 महिने झाले तरी रहिवाशांच्या मनाप्रमाणे GR काढलेले नाहीत, कायमच्या घराचा करार हा तर साध्या झोपडपट्टीच्या पुनरबांधणी करारा पेक्षा वाईट आहे, कॉर्पस फंड मिळणार नाही अशी घोषणा केली जाते मग बीडीडी चाळी रहिवाशी कसे टिकतील ज्या प्रमाणे गिरणी कामगारांना कॉर्पस फंड न मिळाल्याने त्यांना मिळालेल्या मोफत खोल्या विकून परागंदा व्हावे लागले तीच परिस्थिती बीडीडी चाळी रहिवाशांची होईल मग शरद पवार साहेब व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंजी म्हणतात चाळ संस्कृती टिकून राहिली पाहिजे ती कशी टिकणार ? असा सवाल डॉ राजू वाघमारेंनी विचारला .
विकास आम्हा रहिवाशांनाही पाहिजे फक्त आमच्या वास्तववादी मागण्या पूर्ण करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत परंतु दुर्दैवाने काही अधिकारी व काही दलाल मुद्दाम चुका करून हा बीडीडी पुनरबांधणी प्रकल्प लांबवण्याचे गलिच्छ काम करीत आहे हेच आम्हाला सरकारला दाखवून द्यायचे आहे त्यासाठीच हे उपोषण आम्ही आज आयोजित केले होते.
सरकारने त्वरित या प्रकल्पातील रहिवाशांच्या मागण्यांकडे लक्ष देवून विविध GR काढणे व इतर सर्व मागण्या कॉर्पस फंड5 पासून 100 sq फूट तरी वाढवू मिळावे या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे आम्ही सरकारला वेळ दिलाय व आमचा विश्वास आहे की सरकार आमच्या मागण्या मान्य करे पण जर केल्या नाहीत व त्यात मार्ग काढण्यासाठी आम्ही अजूनही येणाऱ्या दसऱ्या पर्यत आम्ही वाट बघू नंतर जनआंदोलनाची दिशा ठरवू व रस्त्यावर उतरू असा इशारा अध्यक्ष डॉ राजू वाघमारे यांनी दिला.