मुंबई
सध्या राज्यात राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हे समीकरण काय नवीन नाही आहे. यातच आता महिला बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा राज्यपालांच्या निशाणा साधला आहे. राज्याचे राज्यपाल यांनी असंवैधनिक वागू नये असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे
केंद्र सरकार विरोधात हा जनतेचा आक्रोश हुकूमशाही आणि हिटलरशाही विरोधातील महाराष्ट्र बंदला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. केंद्र सरकार आणि भाजपाने सातत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यातच लखिंमपुर येथे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा अघोरी प्रकार भाजपाने केला आहे, या विरोधातील जनतेचा हा आक्रोश आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या आणि महिला बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली.
व्यापाऱ्यांचे आणि नोकरदार वर्गाचे आभार
भाजपा आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाही राजवटीच्या विरोधात राज्यातील महा विकास आघाडी सरकारने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे राज्यातील शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे आणि नोकरदार वर्गाचे यासाठी विशेष आभार व्यक्त करीत हिटलरशाही विरोधातील हा आवाज आणखी बुलंद करूया,असे आवाहन देखील ठाकूर यांनी केले आहे. राज्यपालांनी घटनात्मक पदाचा आदर राखावा, राज्यपालांनी असंवैधानिक वागू नये, राज्यपाल सातत्याने असंवैधानिक वागत असल्याचे समोर आले आहे.
तर आम्ही रस्त्यावर उतरू…
लोकशाहीला जर कोणी धक्का देण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. हे दाखवण्यासाठी आम्ही हे आंदोलन राजभवनाबाहेर केले असल्याचे त्यांनी सांगीतले. तर आंदोलनाला काही लोक गालबोट लावायचा प्रयत्न करत होते. ज्यांना आंदोलन सहन होत नाही, जे शेतकऱ्यांना चिरडून मारतात असेच लोक यात आघाडीवर होते असा आरोपही ठाकूर यांनी केला आहे