Voice of Eastern

आगामी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप विविध कृत्य करत असताना शिवसेनेचे नेते आणि बृहन्मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपच्या अरे ला कारे असे उत्तर दिले आहे. तुमचे राजकारण अख्या जगणे बघितले आहे, म्हणून गप्प राहणे हे सोयीस्कर ठरेल असा सल्ला देखील त्यांनी भाजपला दिला आहे. तसेच खालच्या पातळीच्या राजकारणावर भाजपने बोला वे हाच मोठा विनोद आहे असा टोला देखील त्यांनी भारतीय जनता पार्टीला लगावला आहे.

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेना भाजपच्या युतीमध्ये मोठा तडा निर्माण झाला आहे.आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष सध्या एकामेकांच्या विरूध आहे. राज्यात सत्तेत येण्याकरिता हिदुत्व विसरणारी शिवसेना महानगरपालिकेत देखील खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणार का? असा प्रश्न भारतीय जनता पार्टीने विचारल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी त्यांच्या शिवसेना स्टाईल ने रोकठोक उत्तर दिले आहे.

नेमकं काय म्हणाले यशवंत जाधव

खालच्या पातळीच्या राजकारणावर भाजपने बोलावे, हाच मोठा विनोद आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि जम्मू काश्मिरात भाजपची सत्ता आणि राजकारण अख्या जगणे पहिले आहे. म्हणून आता त्यांनी गप्प बसा असा खोचक इशारा देखील त्यांनी भाजपला दिला हाये .

Related posts

राज्यात ११ वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आशियाई विकास बँकेकडून मिळणार ५०० दशलक्ष डॉलर

जागतिक पातळीवर गौरवलेले महाविकास आघाडी सरकार कपटाने पाडण्यात आले – जयंत पाटील

‘वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस’च्या वेळापत्रकात बदल

Leave a Comment