आरोग्य

शिव आरोग्य सेनेमुळे १६ वर्षीय तरुणाला मिळाले उपचार

मुंबई :

घाटकोपर पश्चिमेकडील पार्कसाईट येथील अजय पटेल (१६) याच्या कंबरेखालील भागाची हालचाल अचानक बंद झाली. त्याला उठायला, बसायला आणि चालायला जमत नसल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना आजाराबाबत व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. तसेच रुग्णाकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नसल्याची तक्रार अजय पटेल यांच्या नातेवाईकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिव आरोग्य सेनेकडे केली. याची दखल घेत शिव आरोग्य सेनेने तातडीने केईएम रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्या रुग्णाला उत्तम सेवा मिळवून दिली.

घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मधील प्रभाग क्रमांक १२३ पार्कसाईट येथे वास्तव्यास असलेला अजय पटेल (१६) याच्या कंबरेखालच्या भागाची हालचाल होणे अचानक बंद झाले. त्याला उठायला, बसायला आणि चालायला जमत नव्हते. त्यामुळे त्याला १० मार्च रोजी केईम‌‌ रुग्णालयात दाखल केले‌. मात्र अजयला केईम रुग्णालयातून शिवडी येथील रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. डॉक्टरांकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचे आणि रुग्णाकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. तसेच, कर्मचारी वर्ग आमची दिशाभूल करत असल्याची माहिती अजयच्या नातेवाईकांनी शिव आरोग्य सेनेचे घाटकोपर (पश्चिम) विधानसभा समन्वयक विनायक शंकर कानसकर यांना फोनवरून दिली.

शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊळ आणि कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू सकपाळ, शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश बाबुराव वाणी यांच्या मार्गदर्शनानुसार १५ मार्च २०१४ रोजी रुग्णालयाचे वरिष्ठ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांची रुग्णाच्या नातेवाईकांसमवेत जाऊन‌ भेट घेत घडलेल्या प्रकाराची त्यांना माहिती दिली. डॉ. बांगर यांनी रुग्णाची फाईल तातडीने मागून घेतली. वॉर्डमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. बांगर यांनी समज दिली. यापुढे रुग्णाकडे व्यवस्थित लक्ष देऊ, असे आश्वस्थ केले. त्यानंतर रुग्ण अजय उपचार घेत असलेल्या विभागात जाऊन त्याची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. प्रसंगी रुग्णाचे नातेवाईक आणि आरोग्य सैनिक किशोर भिलारे उपस्थित होते. रुग्ण अजय तसेच त्याचे बंधू समीर पटेल यांनी शिव आरोग्य सेनेचे विशेष आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *