शहर

बेरोजगार उमेदवारांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत १७ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी दिली.

महारोजगार मेळाव्यात राज्यातील नामांकीत उद्योजक /आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारणपणे 10 वी12 वीआयटीआयडिप्लोमापदवीधर तसेच बी.ई. व इतर व्यवसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्त पदांसह राज्यभरातून २५ हजारपेक्षा जास्त रिक्तपदांसाठी उद्योजक/आस्थापनांमार्फत https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करण्यात येत आहेत. होमपेजवरील नोकरी साधक लॉगीनमधून आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन  त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी.  यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोनद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई शहरयेथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या ०२२२२६२६३०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *