मुंबई :
२९ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरच्यावतीने व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक प्रायोजित ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेची मान्यता असलेली हि स्पर्धा पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये खेळविली जाणार असून एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक खेळाडूंनी आपली नावे आपल्या जिल्हा संघटनेकडे २३ मार्च २०२४ पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी केले आहे.