मुंबई :
नेपाळ येथे राहणाऱ्या बाळाला जन्माच्या वेळी डाव्या हाताला गंभीर सेल्युलायटिस झाला होता. जन्मानंतर लगेचच तिला गंभीर संसर्ग झाल्याने, परिणामी संपूर्ण त्वचेवर गँगरीन (नेक्रोसिस) झाल्याने तिच्या हाताची त्वचा काळी पडू लागली होती आणि पालकांना हाताचे विच्छेदन करण्याचा सल्ला देण्यात आला. त्वचेवरील गँगरीन (नेक्रोसिस) म्हणजे हळूहळू हाडांमधीस ऊती नष्ट होणे. अशा स्थितीत स्थानिक तज्ञ डाँक्टरांनी अँम्पुटेशनचा सल्ला दिला. पंरतू पालकांनी धीर न सोडता तिला उपचाराकरिता परेलस्थित बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फाँर चिल्ड्रेन येथे आणण्याचा निर्णय घेतला आणि मग तिथे डॉ. नीलेश सातभाई (सल्लागार प्लास्टिक सर्जन, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन) यांच्या नेतृत्वाखालील टीमने या दोन महिन्याच्या चिमुरडीवर आव्हानात्मक शस्त्रक्रिया करत यशस्वी कामगिरी केली आहे.
जन्मानंतर तीन आठवड्यांनी म्हणजे २५ फेब्रुवारी २०२४ रोजी या बाळाला परेल येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फाँर चिल्ड्रेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाळाचा जन्म नेपाळमध्ये झाला होता. वैद्यकिय इतिहास पाहता बाळाच्या आईने यापूर्वी झालेल्या ६ गर्भधारणेपैकी ४ मुले गमावली होती. जन्मानंतर बाळ नेपाळमधील आयसीयूमध्ये होते, जिथे तिला गंभीर सेल्युलायटिसचे निदान झाले ज्यामुळे तिच्या संपूर्ण डाव्या हातावर त्वचेचे नेक्रोसिस झाले. तिच्या डाव्या हाताची त्वचा काळी पडली होती आणि त्यामुळे मुलीची प्रकृती बिघडली होती. वडिलांनी बाळाला काठमांडूतील मोठ्या रुग्णालयात दाखल केले. परंतु तिथे त्यांना या बाळाच्या डाव्या हाताचे विच्छेदन (अँम्पुटेशन) करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे पालकांनी पुढील उपचारांसाठी मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन येथे धाव घेतली.
बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फाँर चिल्ड्रेन मधील कन्सल्टंट प्लॅस्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सतभाई सांगतात की, बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. स्किन नेक्रोसिस मागचे नेमके कारण माहीत नव्हते. सेल्युलाईटिस हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो त्वचेच्या आतील थरांमध्ये होतो, बहुतेकदा शरीरावर वेदनादायक, लालसर, सूज दिसून येते. सेल्युलाईटिसचे मुख्य कारण म्हणजे स्टॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया. उपचारांमध्ये प्रतिजैविकांचा समावेश होतो आणि ते सहसा प्रभावी ठरते. काही प्रकरणांमध्ये उपचार न केल्यास किंवा प्रतिजैविकांना प्रतिसाद न दिल्यास सेल्युलायटिस खराब होऊ शकते. या वाढीमुळे गंभीर वैद्यकीय परिस्थिती आणि जीवघेणा परिणाम होऊ शकतो. मुलांच्या बाबतीत सेल्युलायटिसमुळे त्वचेवरील मांसल भाग कमी होतो. नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस जो त्वचेच्या सर्वात खोल थरातील संसर्ग आहे आणि जो तुमच्या स्नायू आणि अवयवांमधील ऊतकांमध्ये पसरतो. यामुळे गँगग्रीन (ऊती नष्ट होणे) होऊ शकतो. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये विच्छेदन अपरिहार्य असू शकते.
डॉ. सतभाई पुढे सांगतात की,सुरुवातील बाळाची तपासणी केल्यानंतर त्वरीत त्याचा अवयव वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले. जखम साफ करणे, सर्व मृत ऊतू काढून टाकणे आणि संसर्गाचे कमी करण्यात आला. विविध टप्प्यांत जखम बरी करण्याचा प्रयत्न केला. जखमेच्या डिब्राइडमेंटच्या पहिल्या टप्प्यानंतर, अनेक जखमा धुतल्या गेल्या. नंतर जखम फडक्याने झाकण्यात आल्या. यावेळी मूल फक्त एक महिन्याचे होते. या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी ऍनेस्थेसिया देखीस अत्यंत आव्हानात्मक होते.
हाताच्या दोन्ही बाजूंनी संपूर्ण जखम झाकलेली असल्याची खात्री केल्यानंतर अंतिम टप्प्यात फ्लॅप इन्सेटिंग करण्यात आले. या सर्व शस्त्रक्रिया पाच आठवड्यांच्या कालावधीत करण्यात आल्या. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे आणि ते सामान्य विकासाचे टप्पे गाठत आहे. वेळीच शस्त्रक्रिया केल्यामुळे बाळा हात वाचविवता आला. मूल मोठे झाल्यावर पुढील कार्यासाठी पुनर्रचनात्मक प्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. बाळावर योग्य वेळी उपचार न झाल्यास हाताचे विच्छेदन आणि आजीवन अपंगत्वाचा सामना करावा लागला असता.
वाडिया हॉस्पिटलमध्ये या लहान बाळाचे अवयव वाचवण्यासाठी करण्यात आलेली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया हे येथील तज्ज्ञांचे कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. संपुर्ण टीमने सर्वस्व पणाला लावत या बाळावर यशस्वी उपचार केले. या बाळाला नवे आयुष्य मिळवून दिल्याबद्दल आणि तिच्या हाताची कार्यक्षमता परत मिळवून देण्यास मदत केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला अशी प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केली.
डॉक्टर सतभाई यांच्या नेतृत्वाखाली टिमच्या यशस्वी प्रयत्नाने आज या बाळाला नवे आयुष्य मिळाले. या बाळाला इतक्या कमी वयात अशा कठीण आव्हानाचा सामना करताना पाहणे हा एक त्रासदायक अनुभव होता. काठमांडूतील सर्वात मोठ्या रुग्णालयात देखील आम्हाला हाताचे विच्छेदन करण्याचा सल्ला देण्यात आला तेव्हा आम्ही आमच्या सर्व आशा गमावल्या होत्या. वाडिया हॉस्पिटलने आमच्यासाठी आशेचा किरण ठरला असून आमच्या बाळाचा हात विच्छेदनापासून वाचवण्यात आला. आम्ही आमच्या लेकीचे नाव ‘तमन्ना’ ठेवण्याचा विचार करत आहोत असेही रुग्णाचे वडील श्री अब्दुल अव्वल यांनी स्पष्ट केले.