आरोग्य

राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर; चार दिवसांमध्ये ३६ ने रुग्ण वाढले

१ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताने बाधित ७७ रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई :

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताने बाधित ७७ रुग्ण आढळून आले यातील ८ ते १२ एप्रिलदरम्यान ३६ रुग्ण आढळले आहेत.

राज्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेचा पारा अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमान हे ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून नागरिकांना उन्हामध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र १ मार्चपासून १२ एप्रिलपर्यंत राज्यामध्ये उष्माघाताने बाधित झालेल्या ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यामध्ये ३७३ लोकांना उष्माघाताचा त्रास झाला होता. दरम्यान राज्यामध्ये ८ ते १२ एप्रिलदरम्यान उष्माघाताचा त्रास झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या कालावधीमध्ये ३६ जणांना उष्माघाताचा त्रास झाला असल्याचे आढळून आले आहे. उष्माघाताच्या एकूण रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्ण हे या चार दिवसांमध्ये आढळले आहेत.

राज्यात सापडलेल्या उष्माघाताच्या रुग्णांमध्ये बुलढाणामध्ये सर्वाधिक १२ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल सिंधुदुर्गामध्ये ९, वर्धामध्ये ८, नाशिकमध्ये ६ आणि कोल्हापूरमध्ये ५ रुग्ण सापडले आहेत. तर सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद अकोला, भंडारा, गोंदिया, नांदेड, रत्नागिरी, सातारा, उस्मानाबाद व नागपूरमध्ये प्रत्येकी एक इतकी झाली आहे.

२०२४ मध्ये आतापर्यंत सापडलेले रुग्ण

  • बुलढाणा – १२
  • सिंधुदुर्ग – ९
  • वर्धा – ८
  • नाशिक – ६
  • कोल्हापूर – ५
  • पुणे – ५
  • अमरावती – ३
  • ठाणे – ३
  • सोलापूर – ३
  • धुळे – ३
  • अहमदनगर – २
  • बीड – २
  • परभणी – २
  • रायगड – २
  • चंद्रपूर – २
  • जळगाव – २
  • अकोला – १
  • भंडारा – १
  • गोंदिया – १
  • नांदेड – १
  • रत्नागिरी – १
  • सातारा – १
  • उस्मानाबाद – १
  • नागपूर – १

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *