शहर

आयआयटी वाराणसी येथे समुदाय पोलिसिंगबाबत लोहमार्ग पोलिसांचे सादरीकरण

मुंबई :

आयआयटी वाराणसी येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत आपत्ती व्यवस्थापन आणि मुंबई लोहमार्ग पोलिसांतर्फे राबविण्यात येणाऱ्या समुदाय पोलिसिं उपक्रमांविषयी सादरीकरण करण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीशा चिंचकर व प्रा.अमेय महाजन यांनी समुदाय पोलिसिंग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसदर्भात सादरीकरण केले. विशेष करून महिला सुरक्षेसाठी आणि महिलांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी एक पूरक उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘खाकीतील सखी’ या अभियानाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

आयआयटी वाराणसीचे प्राध्यापक तथा केंद्राचे संचालक प्रा. डॉ. शैलेंद्रकुमार शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहयोगाने ही राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. अनेक नामवंत प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या क्षेत्रात होणाऱ्या कामाचा लेखाजोगा मांडला.

समुदाय पोलिसिंग ही काळाची गरज असून येणाऱ्या काळात असे अनेक उपक्रम तसेच अभ्यासक्रम शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाने सुरू करण्यासाठी सामुहिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न होणे गरजेचे आहे असा मानस मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *