मुंबई :
मुंबई लोहमार्गाचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशन येथे ग्रंथालयाचे निर्माण करण्यात आले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा अभिनव उपक्रम डॉ.रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण रेल्वे पोलीस आयुक्तालयात साकारण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांच्या पुढाकाराने आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने हा ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सामाजिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशन येथे अधिकारी आणि कर्मचारी सहभागातून अनेक पुस्तकं ग्रंथालयासाठी भेट स्वरूपात देण्यात आली. हे या ग्रंथालयाचे विशेष तसेच हॉलचे नूतनीकरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश चिंचकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मुंबई लोहमार्गाचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशन असे अभिनव उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे असा मानस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी व्यक्त केला.