आरोग्य

रुग्णांना कॅशलेस आरोग्य सुविधा पुरविण्यात जेजे रुग्णालय आघाडीवर

रुग्णांना कॅशलेस आरोग्य सुविधा पुरविण्यात जेजे रुग्णालय आघाडीवर

मुंबई :

कोणत्याही आजारावरील उपचार रुग्णांना सहज मिळावेत आणि उपचाराअभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध आरोग्य विमा योजना सुरू केल्या आहेत. या कॅशलेस सुविधेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मुंबईतील जे.जे. रुग्णालय आघाडीवर आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सीईओ दीप्ती गौर मुखर्जी यांनी जे.जे. रुग्णालयाच्य या कामगिरीचे कौतूक केले आहे.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सीईओ दीप्ती गौर मुखर्जी आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी नुकतीच जे.जे. रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान दीप्ती गौर मुखर्जी यांनी पंतप्रधान सार्वजनिक आरोग्य योजनेबरोबरच राज्य व केंद्र सरकारच्या अन्य सरकारी योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवला जातो याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी रुग्णालयामधील रुग्णांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या लाभाची माहिती घेतली.

जे. जे. रुग्णालयात मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच अन्य राज्यातून ही रुग्ण उपचारासाठी येतात. महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत रूग्णांच्या उपचारासाठी जे.जे. रुग्णालयाला २७ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पंतप्रधान जन आराेग्य योजनेद्वारेही रुग्णालयाला माेठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते, असे सांगत जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी लाभार्थ्यांना कॅशलेस योजनेचा लाभ कसा दिला जातो. याची सविस्तर माहिती मुखर्जी यांना दिली. त्याचप्रमाणे या योजनांचा लाभ देताना येणाऱ्या अडचणींची तसेच रुग्णालयातील यंत्रणा डिजिटल करण्यासंदर्भातील माहितीही डॉ. पल्लवी सापळे यांनी यावेळी दिली. यानंतर रुग्णालयातील सर्व यंत्रणा कशी डिजिटल करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या तुकडीने जे.जे. रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, रुग्णांना कॅशलेस सुविधा पुरविण्यासंदर्भात मुंबई जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही जे.जे. रुग्णालयाचा सन्मान करण्यात आल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *