मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शुक्रवारी सात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना सुरूवात करण्यात आली. यामध्ये उच्च शिक्षणाच्या चार तर तंत्र शिक्षणांच्या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीइटी कक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
सीईटी कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात येत असून, शुक्रवारी सात अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना सुरूवात करत त्यांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये एमबीए/एमएमएस, बी. डिझाईन, बी. फार्मसी या तंत्र शिक्षणातंर्गत येणाऱ्या तीन अभ्यासक्रमांचे तर बीएड-एमएड, बी.पी.एड, एम.पी.एड आणि एम.एड या चार उच्च शिक्षणातंर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली. एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २२ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी करायची आहे. तर २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जांची छाननी होऊन ते निश्चित केले जातील. २५ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना तक्रारी नोंदवता येणार आहे. तर ३० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
बी. फार्मसी आणि बी. डिझाईन
अर्ज नोंदणी – १२ ते २० जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
छाननी होऊन अर्ज निश्चिती – १३ ते २१ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
तात्पुरती गुणवत्ता यादी – २३ जुलै
तक्रार नोंदवणे – २४ ते २६ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अंतिम गुणवत्ता यादी – २८ जुलै रोजी
बी.एड-एम.एड आणि एम.एड
अर्ज नोंदणी – १२ ते १५ जुलै
छाननी होऊन अर्ज निश्चिती – १२ ते १७ जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी – १८ जुलै
तक्रार नोंदवणे – १८ ते २० जुलै
अंतिम गुणवत्ता यादी – २३ जुलै रोजी
बी.पी.एड आणि एम.पी.एड
अर्ज नोंदणी – १२ ते १६ जुलै
छाननी होऊन अर्ज निश्चिती – १२ ते १८ जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी – १९ जुलै
तक्रार नोंदवणे – १९ ते २२ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी – २४ जुलै रोजी