शिक्षण

कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; प्रवेशाची पहिली यादी आता ४ ऑगस्टला

मुंबई :

राज्याच्या विविध भागात होणारा जोरदार पाऊस, त्यामुळे वारंवार खंडित होणार वीजपुरवठा, सेतू कार्यालयातून कागदपत्रे मिळण्यास होणारा विलंब यामुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा नऊ शाखांच्या प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी कक्षाने जाहीर केले होते. त्यानुसार १५ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र मुसळधार पाऊस, सेतू कार्यालयातून विद्यार्थांना कागदपत्रे वेळेवर मिळण्यास होणारा विलंब यामुळे अर्ज नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत त्यांना २२ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच पहिली प्रवेश यादी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती सीईटी कक्षाच्या कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी सांगितले.

प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक

  • प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे अपलोड करणे – २२ जुलै
  • अंतरिम गुणवत्ता यादी : २६ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
  • यादीवर हकरत व तक्रार नोंदणी : २७ ते २९ जुलै
  • तक्रारींची यादी प्रसिद्ध : ३० जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : ३१ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
  • पहिली प्रवेश यादी : ४ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
  • प्रवेश घेण्याचा कालावधी : ५ ते ७ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
  • दुसर्‍या फेरीची यादी : ११ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
  • प्रवेश घेण्याचा कालावधी : १२ ते १४ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
  • तिसर्‍या फेरीची यादी जाहीर : १९ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
  • प्रवेश घेण्याचा कालावधी : २० ते २२ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
  • महाविद्यालयात कागदपत्रे व आवश्यक शुल्क भरण्याचा कालावधी : २० ते २३ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
  • केद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशिल जाहीर : २४ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.नंतर)
  • महाविद्यालयस्तरावर प्रवेश फेरी : २ ते ११ सप्टेंबर
  • महाविद्यालयाचे वर्ग सुरु होणार : २६ ऑगस्ट
  • प्रवेश प्रक्रिया संपणार : ११ सप्टेंबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *