शिक्षण

एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

११ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) चालविण्यात येत असलेल्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी आजपासून अर्जाला सुरुवात होत आहे. १७ जुलै ते २४ जुलै २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असून ११ ऑगस्ट २०२४ रोजी ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

दोन्ही अभ्यासक्रम युजीसी आणि एआयसीटी मान्यताप्राप्त आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पात्रता, शूल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज विद्यापीठाच्या https://mumidol.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून सादर करता येईल.

एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) या अभ्यासक्रमासाठी ७२० एवढी प्रवेश क्षमता असून एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) या अभ्यासक्रमासाठी २००० एवढी प्रवेश क्षमता आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने सीडीओईच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी परवानगी दिली असून हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *