चेंबूर :
चेंबूर जिमखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीने मुंबईच्या दीपक कांबळेवर २५-२०, २५-१८ अशी सरळ दोन सेटमध्ये मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे मुंबईच्या कौस्तुभ जागुष्टेने मुंबई उपनगरच्या सुहास पोमेंडकरवर तीन सेटमध्ये १३-२५, २४-१४, २५-७ असा विजय मिळवून आगेकूच केली.
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल
- निलांश चिपळूणकर (मुंबई) वि वि विजय टेमघरे (रायगड) २५-`११. २५-४
- ब्लेसिंग सॅमी (ठाणे) वि वि खान इस्माईल महम्मद इब्राहिम (मुंबई उपनगर) १७-१५, ६-२३, २५-२३
- संजय मांडे (मुंबई) वि वि जावेद सय्यद (मुंबई उपनगर) २४-६, २५-२३
- अभिजित त्रिपनकर (पुणे) वि वि रमेश देवकुळे (ठाणे) १९-१४, २५-११
- सिद्धांत वाडवलकर (मुंबई) वि वि लियाकत नागरजी (मुंबई) १५-२५, २५-९, २५-४
- विवेक पोदार (मुंबई) वि वि विपुल बाबारिया (मुंबई) १८-२५, २५-४, २५-५
- विवेक कांबळे (मुंबई उपनगर) वि वि तेजस म्हात्रे (मुंबई) २५-१६, २३-७
- अजगर शेख (मुंबई उपनगर) वि वि कुलदीप वाघधरे (मुंबई) २५-८, २५-१३
- रहीम खान (पुणे) वि वि महेंद्र वाघ (मुंबई) २५-१५, २५-१