क्रीडा

चेंबूर जिमखाना राज्य कॅरम संगीता – अमोल उपांत्य फेरीत दाखल

चेंबूर :

चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संगीता चांदोरकरने आपल्या अनुभवाच्या जोरावर मुंबईच्याच मिताली पाठकवर १७-१५, २२-११ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांमध्ये उप उपांत्य सामन्यात मुंबईच्या अमोल सावर्डेकरने पुण्याच्या रहिम खानवर अटीतटीच्या लढतीत पहिला सेट १६-२४ असा गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २५-१५, २५-६ असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल

  • महम्मद घुफ्रान (मुंबई) वि वि सौरभ मते (मुंबई) २२-६, २५-१०
  • प्रशांत मोरे (मुंबई) वि वि पंकज पवार (मुंबई) २५-७, १३-२५, २१-१४
  • विकास धारिया (मुंबई) वि वि समीर जाबीर अंसारी (ठाणे) २५-०, २५-९

महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल

  • आकांक्षा कदम (रत्नागिरी) वि वि काजल कुमारी (मुंबई) १६-९, १०-२४, २४-२३
  • निलम घोडके (मुंबई) वि वि अंबिका हरिथ (मुंबई) १९-३, २०-१६
  • रिंकी कुमारी (मुंबई) वि वि केशर निर्गुण (सिंधुदुर्ग) २५-४, २०-१४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *