मुंबई :
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांना दोन प्रतिष्ठित मानपदवी प्रदान करण्यात येणार आहेत. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मेजर जनरल योगेंदर सिंह, अतिरिक्त महासंचालनालय महाराष्ट्र संचालन यांच्या हस्ते कर्नल पदवी प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा विद्यापीठाच्या पाटकर हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनेक एनसीसीचे आणि विद्यापीठाचे मान्यवर उपस्थित राहतील.
याचबरोबर, भारतीय संस्कृती वारशाचे रक्षण करण्यासाठी योगदान दिल्याबदल भारतीय संस्कृती संरक्षण सम्मान देखील त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय डॉक्यूमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन द्वारे प्रदान करण्यात येणार आहे. समारंभामध्ये एनसीसीकडून गीत आणि राष्ट्रगीत सादर करण्यात येणार आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठ आपल्या विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय भावना यांचेही शिक्षण देते. प्रा. चक्रदेव यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने अनेक यशस्वी उपक्रम राबवले आहेत. या दोन्ही मानपदवी हे त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचे प्रतीक आहे.
विद्यापीठपरिवार प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या या यशाचा आनंद घेतो आणि पुढील प्रवासामध्ये त्यांना शुभेच्छा देतो. अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.