क्रीडा

मुंबईत जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन 

मुंबई : 

महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने ५८ व्या जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर, मुंबई – २८ येथे करण्यात आले आहे.

१८ वर्षंखालील मुले व मुली आणि २१ वर्षंखालील मुले व मुली अशा एकंदर ४ गटांमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या वेबसाईटवर उपलब्ध असून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या जिल्हा संघटनांनी आपल्या संघाच्या प्रवेशिका दिनांक १ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नोंदवाव्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *