क्रीडा

रॅपीडो कॅरम सुपर ६ चे मुंबईत आयोजन

मुंबई :

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा आपले ७० वे वर्ष साजरी करत असून त्यानिमित्ताने सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या सहकार्याने इंडियन ऑइल व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत राज्यातील पहिली रॅपीडो कॅरम सुपर ६ स्पर्धा १२ ते १४ ऑगस्ट २०२४ दरम्यान सूर्यवंशी सभागृह, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर ( पश्चिम ), मुंबई – २८ येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा २ गटात हि स्पर्धा रंगणार असून प्रत्येकी ६ बोर्डाचे तीन सेट खेळविण्यात येणार आहेत. शिवाय डायरेक्ट प्रतिस्पर्ध्याची सोंगटी चढविण्यात येणार नसल्याने कमी कालावधीत प्रेक्षकांना अधिक आक्रमक खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाचे प्रथम पारितोषिक ७० हजारांचे असून महिला एकेरी गटातील विजेतीला ३५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या ८ खेळाडूंना मिळून एकंदर २ लाख ७० हजारांच्या ईनामांची बरसात खेळाडूंवर होणार आहे. या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार असल्याने कॅरम रसिकांना या आक्रमक खेळाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. क्रिकेटमध्ये टेस्ट, वन डे आणि २०-२० असे सामने रंगतात. त्याचप्रमाणे कॅरममध्येही राज्यात यापुढे अशा प्रकारचे सामान्य आयोजित केले जाणार आहेत. १४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र कॅरम असोसिशनचा ७० वा वर्धापन दिन असून या दिवशी सायंकाळी राज्यातील कॅरम खेळाडू, पंच, पदाधिकारी मिळून वाद्यवृंद सादर करणार आहेत.
या स्पर्धेचे प्रवेश अर्ज www.maharashtracarromassociation.com या महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या वेबसाईटवर उपलब्ध असून खेळाडूंनी आपली नावे ३१ जुलै २०२४ पर्यंत आपल्या जिल्ह्यांमार्फात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे पाठवावी असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *