शिक्षण

भर पावसात प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांचे जोरदार निदर्शने व थाळी नाद आंदोलन

मुंबई :

नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अंशतः अनुदान घेत असलेल्या सर्वच प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळांना टप्पा वाढ देण्याचे आश्वासन सभागृहामध्ये दिले होते. आश्वासनामध्ये स्पष्टता नाही, याबाबत शासन निर्णय नसल्याने महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांनी संताप व्यक्त करत १२ जुलैपासून महाराष्ट्रभर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनेकदा अर्थमंत्रालयाकडून धोका झाल्याने, अर्थमंत्रालय हे शाळा अनुदानाला लागलेले ग्रहण आहे तर सर्वच शिक्षक आमदार हे शिक्षण खात्याला लागलेलं कलंक असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मुंबई कृती समिती अध्यक्ष संजय डावरे यांनी व्यक्त केली. शासनाच्या निषेधार्थ ५ ऑगस्ट रोजी शिक्षण निरीक्षक पश्चिम मुंबई येथे जिल्ह्यातील शिक्षक सहकुटुंब थाळी नाद आंदोलन केले

गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांचा कायम विनाअनुदान शब्द काढण्यापासून ते प्रचलित नियमानुसार अनुदान मिळण्यासाठी संघर्ष सुरू आहे. संविधानाने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक आमदार हे राखीव ठेवले आहेत. तरीही महाराष्ट्रात सर्वात जास्त आंदोलने ही शिक्षकांनी वेतनासाठी केली आहेत. आजही महाराष्ट्रात सर्वच संघटना आंदोलने करत आहेत. याला जवावदार लाल फितीत अडकवणारे अधिकारी व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार असल्याचे शिक्षक सांगतात. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात सर्वच पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. शाळा अनुदानाचा प्रश्न सोडविण्या ऐवजी सर्वांनी अधिक गुंतागुंतीचा करत पाच वर्षात टप्प्याने १००% मिळणारे १२ वर्ष झाले तरी मिळालेले नाही. महाराष्ट्रामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे व मराठी शाळा चालवणारे हजारो शिक्षक २० वर्ष वेतनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील तर हे फार मोठं शासनाचे अपयश आहे. आजही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा स्तरावर कृती समितीच्या माध्यमातून साखळी आंदोलने, भीक मांगो आंदोलन, थाळी नाद आंदोलन, मुंडन् आंदोलन, अर्ध नग्न आंदोलन, अशा विविध प्रकारे शिक्षक आंदोलन करत आहेत. जोवर निर्णय होत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहणार आहेत. त्याची तीव्रता आणखी वाढवली जाणार आहे.

आचार संहिता लागू होण्यापूर्वी टप्पा वाढीचा निधीसह शासन निर्णय व्हावा ही एकच शिक्षकांची रास्त मागणी आहे. याच मागणीसाठी आज शिक्षण निरीक्षक पश्चिम मुंबई कार्यालयासमोर शिक्षकांचे सहकुटुंब थाळी नाद आंदोलन केले. यावेळी धनाजी साळुंखे, गुलाब पाल, अनिल सिंग, उषा सिंग, सुशीला तिवारी, अशोक दुबे, रणजित सिह, मनोज पांडे, अनिता पाल, जे डी यादव, उमेश तिवारी, अशोक पाल, सुनीता बेडसे, स्वाती पाटील, गोरख भोई, ब्रिंजय सिह, सचिन सिह, निलेश पवार, पवन सिह, तसेंच संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *