मुंबई :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या (Ganeshotsav) आगमनाची तयारी आता सुरु झाली असून हाच बाप्पा आता महाराष्ट्राबाहेर म्हणजेच भारत पाक सीमेवर जाण्यासाठी सज्ज होत आहे. कुर्ला येथे नुकताच (Ganeshotsav) पाद्यपुजन सोहळा संपन्न झाला असून पुढील महिन्यात स्वराज एक्स्प्रेसने बाप्पा (Ganeshotsav) भारत पाक सीमेवरील पुंछ या ठिकाणी जाण्यासाठी तयार होत आहे.
भारत पाक सीमेवर दिवस रात्र देशाच्या सीमेचे रक्षण करणा-या जवानांना गणपती (Ganeshotsav), दिवाळी या सारख्या उत्सवात भाग घेता येत नाही. या जवानांना गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) आनंद घेता यावा यासाठी मानवाधिकार कार्यकर्त्या तसेच प्रोग्रेसिव नेशनच्या कार्याध्यक्षा किरनबाला इशर, शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष छत्रपती आवटे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन पुंछ या ठिकाणी करण्यात येते. गेल्या १४ वर्षांपासून ‘भारत पाक बॉर्डरचा राजा’ (India Pak border cha Raja) म्हणून हा गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो. मूर्तीकार विक्रांत पांढरे यांच्या कुर्ला येथील कार्यशाळेत पाद्यपुजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर वांद्रे येथून स्वराज एक्सप्रेसने जम्मू तावी या ठिकाणी या गणेश मूर्तीला नेण्यात येते. त्यानंतर राष्ट्रीय रायफलचे जवान कडक सुरक्षा व्यवस्थेत तीनशे किलोमीटरवर असलेल्या पुंछ या ठिकाणी बर्फाळ भागातील दऱ्या खोऱ्यातून घाट मार्गाने गणपती बाप्पाला (Ganeshotsav) पुंछ या ठिकाणी स्थापना करण्यासाठी घेऊन जातात. अकरा दिवस हा उत्सव साजरा केल्यानंतर बाप्पाचे (Ganeshotsav) विसर्जन करण्यात येते.