Uncategorizedशहर

एसटीचा कणा असलेल्या कामगारांशी अजित पवार यांनी हितगुज करावी – महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

मुंबई :

एसटी कामगारांच्या प्रश्नावर काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांनी शांत बसले होते. काहीही बोलले नाहीत. मात्र सिन्नर येथे झालेल्या कामगार हितगुज मेळाव्यात मात्र कामगारांप्रती आदर व्यक्त करीत कामगार हा त्या क्षेत्राचा कणा असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही आदर करतो. त्यांना विनंतीवजा आवाहन करतो की, एसटीचा कामगार सुद्धा एसटीचा कणा आहे. बहुतेक सर्व प्रश्न आर्थिक आहेत. आपण अर्थमंत्री असल्याने ते आपणच सोडवू शकता, त्यामुळे एसटी कामगारांच्या झोळीत सुद्धा काही टाकावे असे विनंती वजा आवाहन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केले आहे.

एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन मिळण्यात अजून फक्त सात हजाराची तफावत आहे. राज्य सरकार सवलत मूल्य रक्कम दर महिन्याला वेतनासाठी देत आहे. त्यात अजून फक्त १६० कोटी रुपयांची भर सरकारने टाकली तर वेतनाचा प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो. त्याचप्रमाणे महागाई वाढली आहे. ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आमची मागणीही रास्त आहे. एसटी कर्मचाऱ्यांची इतर कर्मचाऱ्यांशी तुलना केल्यास एसटी कर्मचारी सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक, वृध्द, अपंग, दिव्यांग, महिला यांना सरकारने जाहीर केलेल्या सवलती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. किंबहुना सरकारचे दुत आहेत. अशा कर्मचाऱ्यांशी सुध्दा हितगुज केली पाहिजे. त्यांचे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. असेही बरगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सिन्नर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आयोजित कामगार हितगुज मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केलं. छोटे व्यावसायिक, गोरगरीब कामगार कष्टकरी वर्गाशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर जनतेसाठी सरकारनं काय केलं, कोणत्या योजना हाती घेतल्या, त्या योजना सांगण्यासाठी ही जनसन्मान यात्रा आम्ही काढली आहे. अण्णाभाऊ‌ म्हणायचे की, पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नसून कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. कुठल्याही क्षेत्रातला कामगार हा त्या क्षेत्राचा कणा असतो. त्यावरतीच देश उन्नती करतो आणि उभा राहतो. त्यामुळे देशामध्ये कामगारांचा सन्मान झाला पाहिजे.

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा वेग वाढलेला आहे. टोयोटा किर्लोस्करचा प्रकल्प संभाजीनगरला येत आहे, जिंदल ग्रुपचे ४०-४० हजार कोटींचे दोन प्रकल्प महाराष्ट्रात आणत आहोत. उद्योग क्षेत्रात कामगारांसाठी प्रशिक्षणाच्या योजना चालू आहेत. जपान आणि फ्रान्समध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या कुशल मनुष्य बळाला मागणी आहे. बाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता तरुण-तरुणींनी ठेवली पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *