मुंबई :
येत्या काही दिवसात मुंबईतील सर्व गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन सोहळे पार पडणार. या अगोदर मुंबईतील सर्वच गणेश कार्यशाळॆत बाप्पाच्या मूर्तीचे काम जोरात सुरु आहे. गेल्यावर्षी फुलांचा गणपतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘कोपरखैरण्याचा ईच्छापूर्ती’ या मंडळाने पुन्हा एकदा आपली प्रथा कायम ठेवली आहे. गेल्या वर्षी राज्यातील अष्टविनायक मंदिरातील निर्माल्यातून बाप्पा साकारण्यात आला होता. तर यंदा चक्क अयोध्येतील राम मंदिरातील निर्माल्याचा वापर करून यंदाचा बाप्पा साकारणार आल्याचे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील परेल वर्कशॉप, बकरी अड्डा आणि डिलाईल रोड येथील कार्यशाळॆत उंच, भव्य दिव्य आणि मूर्ती मोठ्या प्रमाणात साकार होत आहे. यातच राजन झाड यांच्या कार्यशाळेत चक्क हा फुलांचा बाप्पा साकार होत आहे. ५०० किलो पेक्षा अधिक फुलांचा वापर करून बाप्पाची ही मूर्ती साकारण्यात येत आहे. याचबरोबर डिंक आणि काथ्याचा वापर करण्यात येत आहे. याच सोबत या मूर्तीला आधार देण्यासाठी कागदी लगद्याचा वापर करण्यात आला आहे.
मंडळाचे अधिकृत चित्र जाहीर
या वर्षी आपल्या बापाचे स्वरूप कसे असणार आहे, या बदल मंडळाने आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. यंदाच्या वर्षी राम अवतारात ‘कोपरखैरण्याचा ईच्छापूर्ती’ साकार होत असल्याचे सांगण्यात आले आले. या संदर्भात नुकतेच मंडळाने अधिकृत चित्र प्रदर्शित करण्यात आले आहे.