शिक्षण

आयआयएम मुंबईचे संचालक मनोजकुमार तिवारी यांच्यावर अधिकाऱ्यांकडून गंभीर आरोप

पवई : 

देशभरात अतिशय प्रतिष्ठित मानली जाणारी भारतीय व्यवस्थापन संस्था- मुंबईच्या संचालक पदावर असलेल्या मनोजकुमार तिवारी यांच्यावर याच संस्थेत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करीत केंद्रीय व्हिजिलन्स, सीएजी तसेच राष्ट्रपतींकडे तक्रार अर्ज दिले आहे. याबाबत न्यायालयात धाव देखील घेण्यात आली आहे. हे आरोप केले म्हणून या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

आयआयएम मुंबईच्या डायरेक्टर पदावर सध्या मनोजकुमार तिवारी आहेत. मात्र त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत ज्यांची भरती शिक्षक म्हणून केली त्यातील ८ जण हे आवश्यक बाबी पूर्ण न करता भरल्याचा आरोप करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी भरती केलेल्या सर्वांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याच बरोबर तिवारी यांनी आयआयएमचा दर्जा त्यांनी पदभार घेतल्यापासून कसा वाढविला हे खोटे भासवून देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कला बोगस माहिती पुरवली आहे. याची पुन्हा पडताळणी केल्यावर सहा क्रमांक आयआयएम मुंबईला कसा बोगस पद्धतीने मिळाला याचे स्पष्टीकरण देखील मिळेल. यातील तिवारी यांचा सहभाग सुद्धा स्पष्ट होईल. याचबरोबर एनआयआरएफला आर्थिक दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष आयआयएम मुंबईचा हिशोब पत्रक तपासले तर यात ६० कोटीचा फरक दिसतो. त्यामुळे यात ६० कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप यात आहे. याबाबत तक्रार करणाऱ्या महिलेला केंद्रातून डेप्युटी सेक्रेटरी यांनी फोन करून आपण तक्रारी करत राहिलात तर आपणास निलंबित करण्यात येईल असे धमकावल्याचे आणि या बाबत फोन रेकॉर्डिंग हि संबंधित यंत्रणांना तक्रारदारांनी पाठविल्या आहेत. याचबरोबर एका व्यक्तीला कन्सल्टन्सी फी च्या नावाने सव्वा लाख प्रति महिना देण्यात येत होते. सदर व्यक्तीला हे पैसे का देण्यात येत होते याचा खुलासा  झाल्यास मोठा भ्रष्टाचार समोर येईल अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत त्रस्त झालेल्या महिला तक्रारदाराने सर्व संबंधित यंत्रणा, संबंधित मंत्रालय आणि अगदी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. मात्र या बाबत कोणतीही कारवाई न झाल्याने आणि आयआयएममधून कायमस्वरूपी काढण्यात येण्याच्या भीतीने या तक्रारदारांनी हतबल झाल्याची भावना व्यक्त केली आहे. याचबरोबर आता न्यायालयात दाद मागितली असल्याने न्यायालयात न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *