मुंबई :
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज यांच्या सहयोगाने इंडियन ऑइल आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबई उपनगरच्या विश्व विजेत्या संदीप दिवेने मुंबईच्या योगेश धोंगडेवर तीन सेटमध्ये झालेल्या रंगतदार लढतीत १४-९, १४-१९ आणि २५-५ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर दुसरीकडे उप उपांत्य सामन्यात ठाण्याच्या महम्मद ओवेसने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर १५-७, ०-२१ आणि २३-५ असा चुरशीचा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिलांची उपउपांत्य फेरी अधिक रंगतदार ठरली. या सामन्यात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने १९-२ असा पहिला सेट जिंकला. तर समृद्धी घाडिगावकरने २५-२ असा सहज सेट जिंकून सामन्यात बरोबरी केली. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये सहा बोर्डानंतर दोनजी खेळाडूंचे १७-१७ असे सामान गुण झाले. त्यामुळे सामना टाय ब्रेकरवर गेला. यामध्ये केशर निर्गुणने मिळालेल्या तीन डावांमध्ये एकदा राणी घेतली. तर समृद्धी मिळालेल्या तीन डावात एकदाही राणी घेतली नाही. त्यामुळे केशर निर्गुण विजयी घोषित करण्यात आली.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल
- महम्मद घुफ्रान (मुंबई) वि वि रहीम खान (पुणे) २१-३, २२-७
- प्रशांत मोरे (मुंबई) वि वि विश्वनाथ देवरुखकर (मुंबई उपनगर) १७-१६, २३-४
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल
- काजल कुमारी (मुंबई) वि वि ऐशा साजिद खान (मुंबई) २०-१३, २१-१
- अंबिका हरिथ (मुंबई) वि वि श्रुती सोनावणे (पालघर) २३-६, २०-८
- प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) वि वि समिधा जाधव (मुंबई) १५-७, १२-५