मुंबई :
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Chief Minister Majhi Ladki Bahin’ scheme) पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ८० लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ( Minister Aditi Tatkare) यांनी दिली.
मंत्री तटकरे (Minister Aditi Tatkare) म्हणाल्या की, १४ ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८० लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना सुद्धा १७ ऑगस्टपर्यत हा लाभ मिळणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना (Chief Minister Majhi Ladki Bahin’ scheme) जाहीर झाल्यानंतर या योजनेला (Chief Minister Majhi Ladki Bahin’ scheme) महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १४ ऑगस्टपर्यत १ कोटी ६२ लाखापेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे.