शहर

फेसबुकवर नाही तर फेस टू फेस काम करणारे सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दोन वर्षात २२ हजार ३६४ फाईल्सचा निपटारा

मुंबई : 

जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या महायुती सरकारच्या २५ महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल २२ हजार ३६४ फाईल्सचा निपटारा केला आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या तुलनेत दुप्पट फाईल्सचा निपटारा आणि तिप्पट कामांना मंजुरी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक नव्हे तर फेस टू फेस काम करणारे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. इतक्या कमी कालावधीत हजारो फाइलींचा निपटारा करुन मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) विक्रमी कामगिरी केली.

१ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२४ या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा दुप्पट वेगाने फाईलींचा निपटारा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी २५ महिन्यांत तिप्पट कामांना मंजुरी दिली. राज्यातील विकासकामांचे प्रस्ताव आणि जनहिताच्या फाईल्सचा वेगाने पाठपुरवठा करून मुख्यमंत्री कार्यालयाने मंजूर केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले होते. उर्वरित काळात फेसबुकवर काम करुन त्यांनी राज्याचा प्रगतीचा गाडा रोखला होता. विकास कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात पिछाडीवर नेण्याचे काम उबाठांनी केले होते.

उबाठांच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुप्पट फाईल्सला मंजुरी दिली आहे. याच काळात राज्यातील विविध प्रकारच्या तिप्पट कामांना मंजुरी दिली असून राज्याच्या अर्थचक्राला गती दिली आहे.

आकडेवारीनुसार गेल्या २५ महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडे २३ हज़ार ६७४ फ़ाईल्स प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी २२ हजार ३६४ फाईल्सला मंजुरी देण्यात आली. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाची ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. तर १ जानेवारी २०२० ते २० मे २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे ११ हजार २२७ फाईल्स प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी केवळ ६ हजार ८२४ फाईल्स मंजूर करण्यात आल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *