शिक्षण

बदलापूरच्या घटनेनंतर शाळा, महाविद्यालयातील मुलींच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांना कपिल पाटील यांचे पत्र

मुंबई :

बदलापूरच्या रेल्वे फलाटावर एका ताईने मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला, ‘या जागी तुमची मुलगी असती तर ?’ बदलापूरच्या घृणास्पद घटनेने संतप्त झालेल्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांनी सुद्धा ”If the school is not a safe place than what is the use of speaking about right to education” अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात गेल्या पाच वर्षात स्त्रियांवरील अत्याचाराच्या २० हजार घटनांची नोंद झाली आहे. सरकारं बदलतात, सत्तेवर कोणीही येवो परिस्थिती बदलत नाही. म्हणून लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना आणि व्यवस्थेविरोधात चीड निर्माण झाली आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून शाळा व्यवस्थेने व पोलिस यंत्रणेने जे करायला हवं, जी संवेदनशीलता दाखवला हवी ते होत नाही, म्हणून लोक संतप्त आहेत.

शाळेत जाणारी प्रत्येक मुलगी आणि मुलगाही सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी शिक्षणमंत्री काही गोष्टी आपण सहज करू शकतील. आपण काही पावलं उचलली आहेत. CCTV सारख्या उपाययोजना या घटना घडून गेल्यानंतर गुन्हेगार पकडण्यासाठी योग्य आहेत. पण अशा घटना घडूच नयेत आणि मुलामुलींना निर्भयपणे वावरता यावं, यासाठीही काही उपाययोजना करणं आवश्यक आहे.

शिक्षक आमदार असताना मी मुंबई पोलिसांच्या मदतीने काही उपक्रम राबविले होते. पोलिसांची शाळेला भेट, मुलांसाठी हेल्पलाईन, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शिक्षक भारतीच्या कार्यक्रमात येऊन मुलांसाठी हेल्पलाईनची घोषणा केली होती.

त्या धर्तीवर काही नव्याने गोष्टी करता येतील

  • स्थानिक पोलिस ठाण्यामधील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालये यांना नियमित भेट देणे.
  • स्कूल बस, रिक्षा, टॅक्सी चालक, वाहक यांची नियमित तपासणी व चौकशी करणे.
  • पोलिस हेल्पलाईनचा नंबर ठळकपणे शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्गात आणि स्वच्छतागृहात लावणे.
  • शाळा, महाविद्यालयामध्ये अडचणींच्या जागी पॅनिक बटणची व्यवस्था करणे. (शहरी भागात हे सहज शक्य आहे.)
  • प्रत्येक पोलिस ठाण्यालाला ‘माझी बहीण, सुरक्षित बहीण’ या मथळ्याखाली स्त्रियांचे तक्रारीचे अधिकार, हेल्पलाईनचे नंबर आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर मोठ्या अक्षरात लिहणे.
  • कोणत्याही पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून घेण्यास उशीर झाल्यास थेट कंट्रोल रूमचा नंबर उपलब्ध करून देणे.
  • शाळांमध्ये लहान मुली, मुलांसाठी Bad Touch आणि Good Touch बद्दल समुपदेशकांचे कार्यक्रम ठेवणे.
  • शाळा व कॉलेज व्यवस्थापनाने मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय करणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *