आरोग्यशहर

अब की बार ४०० पार…

-धवल सोलंकी, मुंबई

भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मूर्ती म्हणून ओळखला जाणारा किंग्ज सर्कल येथील GSB सेवा मंडळाने यंदा रेकॉर्ड ब्रेकिंग गणेशोत्सव विमा पॉलिसी काढली आहे. यंदा विक्रमी ४००.५८ कोटी रुपयांचा गणेशोत्सव विमा संरक्षण काढण्यात आला आहे. तर मागील वर्षी विक्रमी ३६०.४० कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढला होता. The New India Insurance Co. Ltd द्वारे हा विमा संरक्षण काढण्यात आला आहे.

दर वर्षी मुंबईसह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो भाविक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करतात. यातच मोठ्या मंडळात लाखो भाविक देखील आपल्या बाप्पाच्या दर्शनाला येत असतात. याच सगळ्या गोष्टींची काळजी घेत मंडळांनी विमा कवच काढण्याचा निर्णय घेतात.

या तारखीला होणार विराट दर्शन… 

सालाबादप्रमाणे या वर्षी देखील बाप्पाचे विराट दर्शन होणार असून या वर्षी ५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. तर गणेशोत्सव ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर मध्ये उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती अशी ख्याती असलेल्या मुंबईतील GSB सेवा मंडळ, किंग सर्कल यांनी चक्क ४०० कोटींपेक्षा अधिकचा विमा कवच काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळात बाप्पाला ६६ किलो पेक्षा अधिक सोनं आणि ३०० किलो पेक्षा अधिक चांदीचे दागिने असतात. पाच दिवसांच्या या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

येणारे भाविक, कार्यकर्ते, बाप्पाचे दागिने अश्या सर्व गोष्टींची सुरक्षता लक्षात घेता मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
-अमीत पै, अध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *