शहर

नागरिकांनी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना काळजी घ्या : मुंबई महानगरपालिका

मुंबई : 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करू शकणारे अपायकारक मासे हे मत्स्य विभागाने केलेल्या ‘ट्रायल नेटिंग’ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून कळविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे गणेश भक्तांना मत्स्यदंश करणाऱ्या माशांचे अस्तित्व आहे काय? यासाठीची चाचपणी (ट्रायल नेटिंग) नुकतीच केली. यादरम्यान ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फीश, शिंगटी, ब्लू जेली फीश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळून आहेत. नेटींग दरम्यान पाकट (स्टिंग रे) हे मासे आढळून आले आहेत. त्यासोबतच माशांसोबतच जेली फीश, ब्लू जेली फीश हे अपायकारक मासे आढळून आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी

१. श्रीगणेश मूर्ती विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक केलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेमार्फत करावे.

२. श्रीगणेश मूर्ती विसर्जनादरम्यान गणेशभक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करणे टाळावे.

३. गणेश विसर्जनादरम्यान पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

४. बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे विसर्जन ठिकाणी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

५. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी आवश्यक तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रथमोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्ष असणार आहेत. मत्स्यदंशाची घटना घडल्यास संबंधितांनी तात्काळ प्रथमोपचारासाठी या वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *