मुंबई :
राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये तीन केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून यंदा ७६ टक्के प्रवेश झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी प्रवेश वाढले आहेत. १५ सप्टेंबरदरम्यान college level round, संस्थात्मक व व्यवस्थापन फेरीद्वारे प्रवेश होणार असल्याने कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कृषी शिक्षणामध्ये बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा नऊ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविली जाते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ४ जुलैपासून सुरूवात झाली आहे. सीईटी कक्षामार्फत १८ हजार १७७ जागांसाठी राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये १२ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. हे प्रमाण एकूण जागांच्या ७६ टक्के इतके आहे. तसेच रिक्त राहिलेल्या ३ हजार २८४ जागांवर १५ सप्टेंबर paryant, college level roundसंस्थात्मक व व्यवस्थापन फेरीद्वारे प्रवेश दिले जाणार आहे. अधिक चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी पहिल्या फेरीमध्ये ११ हजार २२५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिल्यानंतरही फक्त ३२९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या फेरीमध्ये अनुक्रमे ३५२२ आणि ३८१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर केंद्रनिहाय झालेल्या प्रवेशादरम्यान ३२१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र college level round संस्थात्मक व व्यवस्थापन फेरीद्वारे कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाचे समन्वयक परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी सांगितले.
बी.एस्सी कृषी या अभ्यासक्रमाला ९ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. बी.टेक अन्न तंत्रज्ञान ९१४ विद्यार्थी, बी.एस्सी उद्यानविद्या अभ्यासक्रमाला ७८१, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन ५९७, बी.टेक जैवतंत्रज्ञान ५४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, अशी माहिती डॉ. मंगेश निकम यांनी दिली.