आरोग्य

थकलेल्या गणेश भक्तांसाठी पॅरागॉनचा सुखाचा विसावा

मुंबई : 

गणेश दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहून थकलेल्या गणेश भक्तांच्या पायांना थोडा आराम मिळावा… पुढच्या दर्शनासाठी पायात बळ यावे म्हणून पॅरागॉनने मुंबईतील अनेक प्रतिष्ठित-नामांकित आणि भक्तांची विघ्नहर्त्या गणेश मंडळांच्या आवारातच सुखाचा विसावा उभारला आहे. यात गणेशभक्तांच्या पायांना मोफत फुटमसाज करण्याची सोय केली आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या जगभरात मुंबईच्या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जाते. त्यामुळे मुंबईतील शेकडो गणेशोत्सव मंडळे गणेशभक्तांच्या नजरेसमोर असतात. मुंबईबाहेरील असो किंवा मुंबईतील असो सार्‍याच गणेशभक्तांचे विशेष आकर्षण लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, चेंबूर येथील गणेशोत्सव मंडळे असतात. मग ती गणेशाची भव्य मूर्ती असो किंवा ऐतिहासिक देखावे. हे याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी दररोज लाखोच्या संख्येने भाविक येताहेत. सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी असल्यामुळे भाविकांना तीन-चार तास रांगेत उभे राहावे लागतेय. अशा स्थितीत थकलेल्या भक्तांच्या पायाला थोडासा आराम मिळावा म्हणून चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या पॅरागॉनने लालबागमधील मुंबईचा राजा (गणेशगल्ली), परळचे लाल मैदान, खेतवाडीतील खेतवाडीचा राजा, फोर्टचा चिंतामणी, चेंबूरचे सह्याद्री क्रीडा मंडळ येथे सुखाचा विसावा म्हणून फुट मसाजच्या मशीन लावल्या आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या विनामूल्य सेवेचा आवर्जून लाभ घेत आहेत.

फूटमसाजनंतर भक्तांचा दूर होणारा थकवा पाहून पॅरागॉनने ही सेवा मुंबईतील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांमध्ये सुरू करण्याचा मानस पॅरागॉनने व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *