मुंबई :
अखिल भारतीय कॅरम महासंघाच्यावतीने २३ ते २६ सप्टेंबर २०२४ पासून एल एन आय पी ए, ग्वालियर, मध्य प्रदेश येथे ४९ वी जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी ८ मुले, ८ मुली व संघ व्यवस्थापक असा एकंदर १८ जणांचा महाराष्ट्राचा संघ ग्वालियर येथे रवाना झाला आहे. सांघिक व वयक्तिक अशा दोन गटांमध्ये या संघातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने संघाला प्रत्येकी २ टी शर्ट्स, २ ट्राऊजर्स, वातानुकिलित रेल्वे प्रवास सवलत तसेच प्रत्येकी १,००० रुपये खर्चासाठी देण्यात आले आहेत. स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी संघाचे २ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर मुंबईत घेण्यात आले होते.
असा आहे महाराष्ट्राचा संघ
- १८ वर्षा खालील मुले (जुनियर गट) : १) कौस्तुभ जागुष्टे २) आयुष गरुड ३) महम्मद हसनैन अर्शद शेख ४) सार्थक केरकर ५) मुनावर अब्बास अन्वर अब्बास सय्यद ६) भाव्या सोलंकी
- २१ वर्षाखालील मुले (युथ गट) : १) शेख फैझान अब्दुल रहिमान २) अथर्व पाटील (राजेश निर्गुण, संघ व्यवस्थापक)
- १८ वर्षा खालील मुली (जुनियर गट) : १) दीक्षा चव्हाण २) मधुरा देवळे ३) रुची माचीवाले ४) आर्या घाणेकर ५) सिमरन शिंदे ६) ज्ञानेश्वरी इंगुळकर
- २१ वर्षा खालील मुली (युथ गट) : १) केशर निर्गुण २) सखी दातार (संध्या देवळे, संघ व्यवस्थापक)