मुंबई :
महाराष्ट्र राज्यासह बृहन्मुंबई शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक (नर्सरी ते इ. १२ वी पर्यतच्या) शाळांच्या व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. तसेच रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील चार दिवस मुसळधारा कोसळण्याचा इशारा दिला असून, गुरुवारी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित (नर्सरी ते इ. १२ वी पर्यतंच्या) शाळांना व महाविद्यालयांना २६ सप्टेंबर २०२४ रोजी अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी राजू तडवी आणि शिक्षणाधिकारी (प्राथ) बृहन्मुंबई महानगरपालिका राजेश कंकाळ यांनी जाहीर केले आहे.