शिक्षण

बीएस्सी नर्सिंगच्या अतिरिक्त फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई :

भारतीय परिचर्या परिषदेने (Indian nursing council) परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबरवरून ३१ ऑक्टोबर केली होती. त्यामुळे बीएस्सी नर्सिंग (B.sc nursing) अभ्यासक्रमाची अतिरिक्त फेरी राबविण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (Cet cell) घेण्यात आला आहे. या फेरीला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

बीएस्सी नर्सिंग (B.sc nursing) विद्यार्थ्यांना २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज नोंदणी (online registration) करायची आहे. तर ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरायचे आहे. ४ ऑक्टोबर रोजी अंतरिम गुणवत्ता यादी आणि जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरायचा आहे. १० ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांना ११ ते १६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. १६ ऑक्टोबरपासून संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेला सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना १६ ऑक्टोबर रोजी प्रवेश रद्द करता येणार आहेत. १७ ऑक्टोबर रोजी संस्थात्मक प्रवेश फेरीसाठीच्या (institutional round) जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. ही फेरी ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

सीईटी कक्षाकडून बीएस्सी नर्सिंग (B.sc nursing) प्रवेशासाठीची परीक्षा २८ मे रोजी घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल १९ जून रोजी जाहीर झाला होता. पहिली फेरी १ ऑगस्टपासून राबविण्यास सुरुवात आली आहे. आतापर्यंत बीएस्सी नर्सिंगच्या (B.sc nursing) तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर संस्थात्मक फेरी सुरू होणार होती. मात्र त्यापूर्वी भारतीय परिचर्या परिषदेने (Indian nursing council) प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (Cet cell) बीएस्सी नर्सिंग (B.sc nursing) अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार बीएस्सी नर्सिंग (B.sc nursing) अभ्यासक्रमाची अतिरिक्त फेरी २७ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *