मुंबई :
एस एन डी टी महिला विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला अनुसरून विद्यापीठात व विद्यापीठा बाहेरील विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम अधिक लवचिकपणे व प्रवेशयोग्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी सेंटर फॉर हॉलेस्टिक एज्युकाशन, ट्रेनिंग आणि नोव्हेल आडवान्समेंट म्हणजेच चेतना ची २०२२ मध्ये स्थपणा केली आहे. या केंद्रा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार व आवडीनुसार त्यांच्या कौशल्य व क्षमता वृद्धी साठी नावीन्यपूर्ण क्रेडिट कोर्स उपलब्ध करून दिले जातात. हे कोर्स विद्यापीठाचे विभाग, संचलित व संलग्नित महाविद्यालये त्यांच्या पातळीवर चेतनाच्या मान्यतेने व निरीक्षणाखाली राबवितात. सदर शैक्षणिक वर्षात २०० पेक्षा अधिक कोर्स राबविले गेले व त्याचा १५ हजाराहून अधिक विद्याथीनिनी लाभ घेतला आहे.
चेतना अंतर्गत विद्यापीठ संचलित पी व्ही डी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने, एकूण तीन ऑनलाइन क्रेडिट कोर्स राबविले त्यात “अध्ययन-अध्यापनात २१ व्या शतकातील कौशल्याचे एकात्मिकरण’ हा कोर्स देशभरातील ६७० हुन अधिक विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या सहा बॅच मध्ये यशस्वीपणे पूर्ण केला आहे व महाविद्यालयासाठी ५ लाखापेक्षा अधिक चा रेव्हेन्यू मिळवून दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रथम पसंतीस उतरलेल्या या कोर्सने चेतनाकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमधील २०२३-२४ साठीचा सर्वोत्कृष्ट चेतना क्रेडिट कोर्स या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे. हा पुरस्कार माननीय कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या चेतनाच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रोफेसर अपूर्वा पालकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यासाठी सदरील कोर्स चे विकसन, व आयोजन करणारे महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश कोलतमे, प्रभारी प्राचार्य डॉ संजय शेडमके व त्यांच्या टीम चे विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक उज्वला चक्रदेव, प्र कुलगुरू रुबी ओझा आणि कुलसचिव डॉ विलास नांदवडेकर यांनी अभिनंदन केले आहे.