मुंबई :
भारतरत्न महर्षीकर्वे ज्ञान स्त्रोत्र केंद्र, एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ आर्टस अँड एस.सी.बी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फॉर उमेन, चर्चगेट आणि पी.व्ही.डी.टी कॉलेज ऑफ एज्युकेशन,चर्चगेट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोस्तव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून वित्त व लेखा अधिकारी विकास देसाई हे होते. ग्रंथाचे वाचन कसे महत्त्वाचे आहे यावर दोन्ही प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थिंनीना संबोधित केले. त्याच दिवशी दुपारी दोन वाजता विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विजेत्या विद्यार्थिनींना बक्षीस देण्यात आली. ग्रंथ विक्रेत्यांनी आपला ग्रंथाचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल लावले होते.
दुसरा दिवस ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध निवेदिका दिपाली केळकर यांचा “शब्दांच्या गावा जावे” हा कार्यक्रम आयोजित केला होता. यात शब्दांचे महत्त्व त्यांनी सुरुवातीला सांगितले, त्यानंतर शब्दांची व्यक्तिमत्व, स्वभाव, प्रकार, गंमती जंमती, गाण्यातील शब्दांचे सौंदर्य इत्यादींनी नटलेला हा कार्यक्रम होता, त्यात त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले. अध्यक्षीय समारोप डॉ. संजय शेडमाके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डाॅ. जास्वंदी वांबुरकर यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिता धुरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.