गुन्हे

मोबाईल चोरला म्हणून तरुणाची हत्या, तीन तासांत आरोपीना अटक

ठाणे :

मोबाईल चोरीच्या कारणावरून कामाकरिता आलेल्या एका तरुणाची भिवंडी येथील शांतीनगर येथे हत्या झाल्याची घटना घडली असल्याने सात आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शांतीनगर पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक 1639/ 2024 बीएनएस कलम 103 प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यात मृतक आणि आरोपी अनोळखी होते. पोलिसाना मिळालेल्या माहिती नुसार सदरचा गुन्हा अवघ्या तीन तासात शांतीनगर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

मोबाईल चोरीच्या कारणावरून सदर गुन्हा झाला. सहयोग नगर येथे राहणारा मो. अरमान व त्याचे चार-पाच मित्र यांनी मृतकाला मोबाईल चोरी केली म्हणून गोविंदनगर येथील राहुल हॉटेलच्य मागे, पाईपलाइन रोड, भिवंडी येथे लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली यामध्ये मोहम्मद रहमत शहा आलम (20) ह्याचा मृत्यू झाला. आरोपीना शोधण्याकरिता पोलिसानी पथके तयार करून अरमान व त्याचे साथीदार यांचा शोध घेतला व सदर गुन्ह्यात आत्तापर्यंत सात आरोपींना अटक करून पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले.

पोलिसांनी सोशिअल मीडियावर मृतकाचा फोटो परिसरात व्हायरल करून ओळख पटवली मृतक मोहम्मद रहमत शहा आलम ( 20) मूळचा राहणार कलकत्ता, पश्चिम बंगाल असे असून तो सहा महिन्यापूर्वी भिवंडी येथे कामासाठी आला होता. त्याच्या भावाने त्याची मृत शरीर ओळखले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या घटनेमध्ये आणखी काही आरोपी असण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करून उत्तर प्रदेश, बिहार येथे रवाना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *