क्रीडा

रोटरी क्लब रॅपीडो कॅरम स्पर्धेत प्रशांत – अंबिका जेते

मुंबई : 

रोटरी क्लब डोंबिवली पूर्व आयोजित रोटरी क्लब रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने ठाण्याच्या झैद अहमद फारुकीचा अंतिम सामन्यात २३-६, २३-१६ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून जेतेपद पटकाविले. तर महिलांच्याअंतिम सामन्यात मुंबईच्या अंबिका हरिथने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर २३-०, १०-७ असा सरळ विजय मिळवून विजेतेपदाला गवसणी घातली.

तिसऱ्या क्रमांकासाठी पुरुष गटासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या अभिजित त्रिपनकरने मुंबईच्या विकास धारियावर २०-१७, २३-४ अशी मात केली. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरवर २०-१३, १९-११ असा विजय मिळविला.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष माधव सिंग, सचिव चक्रपाणी शुक्ला, राज्य कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव जितेंद्र दळवी व आंतर राष्ट्रीय पंच आशिष बागकार यांच्या उपस्थितीत विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. कुपोषित बालकांना मदत कारण्याहेतू आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनने केलेल्या विशेष मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष माधव सिंग यांनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनला साईटेशन देऊन सन्मानित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *