मुंबई :
मुंबई विद्यापीठातर्फे पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा ( पेट ) १७ नोव्हेंबर २०२४ ला विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. तसेच या परीक्षेसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२४ मुदतवाढ देण्यात आली असून सर्व परीक्षार्थींनी विहीत कालावधीत निर्धारीत शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याचेही आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठातर्फे पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा ( पेट ) १७ नोव्हेंबर २०२४ ला विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. चारही विद्याशाखेतील विविध ७६ विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या दोन तासाच्या कालावधीत ही परीक्षा त्या-त्या केंद्रावर घेतली जाणार आहे. परीक्षार्थींनी ३० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
तसेच या परीक्षेसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२४ मुदतवाढ देण्यात आली असून सर्व परीक्षार्थींनी विहीत कालावधीत निर्धारीत शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. या परीक्षेचा तपशील https://uompet2024.formsubmit.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.