मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्या गाथा त्यांनी गाजविलेला पराक्रम गड किल्ल्यांचे केलेले संवर्धन हा इतिहास मुलांना लहान वयातच समजावा यासाठी दिवाळीचे औचित्य साधतं चिमुकल्यानी किल्ला साकाराला.
प्रभादेवी साई भक्तीमार्गांवरील निर्मिती सोसायटीमधील चिमुकल्यानी मोठ्यांच्या मदतीने उत्सुकतेने पेपरपासून बनविलेला किल्ला साकारला.निर्मिती सोसायटीमधील दृष्टी दळवी, स्वस्ती साळवी, श्लोक मयेकर, सार्थक भुरवणे, शांभवी शिगवण, समर्थ सुर्वे आदी मुलांनी अनंत मुरकर, सिकंदर दळवी, अमोल चव्हाण, सुप्रिया दळवी, नीता चव्हाण, श्रद्धा गजने, अनिता काताळे, प्रणाली बिर्जे, हर्ष मुरकर, अक्षय सुर्वे, हर्षद गोठणकर यांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात किल्ला बनवून शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
सोसायटीच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात, तसेच किल्ला बनविला जातो याला सर्व रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.